मा. श्री. केसरीभाऊ पाटील यांचे दु:खद निधन
– – मान. श्री. केसरीभाऊ पाटील हे समाजाचे भूषण होते.
– – पर्यटन क्षेत्रात त्यांच्या नावाचा दबदबा होता. काश्मीरसारख्या संवेदनशील भागात केसरी टूर्सचे नाव आदराने घेतले जाते.
– – श्री केसरीभाऊंचा नावलौकिक सोमवंशी क्षत्रिय समाजापुरता मर्यादित नव्हता. बहुजनसमाजात त्यांना मानाचे स्थान होते.
– समाजबांधवांच्या आग्रहाखातर त्यांनी संघाचे अध्यक्षपदही भूषविले. समाजाच्या उपक्रमांत ते नेहमी सामील होत. ते समाजाचे मार्गदर्शक होते. त्यांनी समाजवास्तूसाठी तर त्यांनी तीन कोटींची देणगी जाहीर केली आहे.
– – त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. माणूस म्हणून ते आदर्श होते.
– – त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
सोमवंशी क्षत्रिय वाडवळ समाजाचे तात्कालीन अध्यक्ष,समाज भूषण पर्यटन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे केशरीनाथ उर्फ केसरीभाऊ रावजी पाटील वय 87 यांचे शनिवार दिनांक 15 रोजी पहाटे पाच वाजून 30 मिनिटांनी वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता पाटील, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम पाटील, वीणा वर्ल्डच्या संचालिका वीणा पाटील अशा दोन विवाहित मुली, शैलेश व हिमांशू विवाहित मुले व सुना नातवंडे असा परिवार आहे. मनमिळावू स्वभावाचे तसेच विकासाच्या वाटा शोधून तरुण–तरुणींना व्यवसायात वृद्धी करण्यासाठी सातत्याने धडपडणारे समाजभूषण म्हणून केसरीनाथ पाटील यांची सर्वत्र ओळख होती.
मूळचे पालघर तालुक्यातील सफाळे जवळील मथाने गावातील जन्मभूमी असलेले केसरी भाऊंनी आपल्या करिअरची सुरुवात आचार्य भिसे व चित्रे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली बोर्डी येथील सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल शाळेत शिक्षक म्हणून सुरुवात केली होती. विद्यार्थी दशेत असतानाच सर्वसामान्य माणसाला भ्रमण करण्याची आवड निर्माण करून वेगळा मार्ग निवडण्याची इच्छा असल्याने पर्यटन क्षेत्रात त्यांनी आपल्या व्यवसायाला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली होती. अतिशय मृदूभाषीक स्वभावातून मार्गदर्शक म्हणून काम करीत असताना त्यांनी सर्व समाजाशी व सर्व वर्गातील लोकांची सलोखाची ब भूमिका बजावली होती. कोणतेही क्षेत्र असो त्या क्षेत्राचा विकास लोकांच्या दृष्टिक्षेपात आणण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या भागात पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने तरुणांना यथायोग्य मार्गदर्शन केले. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे अध्यक्ष पद भूषवत असताना त्यांनी सूर्या धरणाचे पाणी ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात आणण्यासाठी तसेच त्या भागातील कृषी विकास साधण्यासाठी प्रयत्न करून क्षत्रेक्य परिषदेचे नेते पुष्पकांत म्हात्रे यांच्या मदतीने पालघर तालुक्यातील केळवे येथे तात्कालीन कृषी मंत्री शरद पवारांच्या उपस्थितीत पाणी परिषदेचे आयोजन देखील केले होते.
शून्यातून विश्व निर्माण करण्याचे कर्तुत्व व भाग्य सर्वांना शक्य होत नाही त्यासाठी लागते प्रचंड मेहनत ,पडेल ते काम करण्याची तयारी ,मान अपमान झेलण्याची मानसिकता, जीवनात आलेल्या कोणत्याही बऱ्या वाईट प्रसंगांना तोंड देण्याची तयारी ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन!! भाऊंच्या अंगी हे सर्व असलेले मी अनुभविले. म्हणून ते त्यांच्या क्षेत्रात सम्राट झाले..
‘जीवनाच्या संध्यासमयी भाऊ यशोशिखरावर आरूढ झाले होते. तरी त्यांचा ऊमेदीचा काळ खूपच संघर्षमय होता. त्या काळात त्यांनी भोगलेले खडतर आयुष्य , झेललेली संकटे, मानापमानाचे प्रसंग आणि त्यांचा केलेला सामना ,हे पाहिल्यानंतर आजच्या वैभवा मागील कष्ट समजून येतील
केसरी भाऊ शेतकरी कुटुंबातील असल्याने पर्यटन व्यवसायाबरोबरच ग्रामीण भागातील समाज बांधवांनी शेती व कृषीचा विकास करावा त्याचप्रमाणे प्रक्रिया उद्योगात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी देखील त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पर्यटन व्यवसायीकांनी जागतिक पातळीवरती आपला ठसा उमटवला याचे श्रेय केसरी पाटील यांचे आहे.पालघर जिल्ह्यातील वसई ते बोर्डी पर्यंत वास्तव्य व शेती करणारा सोमवंशी क्षत्रिय समाजाबरोबरच इतर समाजातील तरुणांनी स्थानिक पातळीवर कृषी पर्यटन विकास करावा यासाठी त्यांनी वीस वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या चळवळीला मूर्त स्वरूप आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे त्याचे श्रेय देखील केसरी पाटील यांना दिले जात आहे.
– – त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना🙏
Vishram Dham is build in 1970 as part of school’s golden jubilee celebration. It is built, run and managed by SPH Past-student Association- सु पे ह हायस्कूल माजी विद्यार्थी संघ, बोर्डी. Bordi beach being tourist attraction, the VishramDham & S.R. Save Camping Ground has become very popular among lodging facilities at Bordi for tourist. The rooms can be booked by informing the authorities in advance.
Come Experience The Goodness Of Art, Vernacular Architecture And Our Natural Haven!
Dahanu Bordi Beach is located in Dahanu taluka of Palghar district. It is spread over a distance of 17 km. Not only for its extensive and tidy beach, Dahanu is also known for its vast chikoo fruit orchids. Although, it is quite warm during summer, the gentle breeze cools down the entire beach. It is also famous for the Chikoo fruit and has many Chikoo farms.
Vishram Dham, SPH HighSchool past student association,
Bordi Tal: Dahanu Distt: Palghar 401701.
Telephone No. +91 7620729465
Bordi is located on the coastal side of Maharashtra-Gujarat State border. Gholvad (Western Railway), is 2-3kms away, is the nearest railway station and it is accessible by auto-rickshaw as well as ST buses. Dahanu, a quiet seaside town with a sprawling, uncluttered beach, is situated in Thane District.